Devendra Fadnavis : महाराष्ट्रामध्ये दोन विधानसभेच्या पोटनिवडणुका सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाला असा गौप्यस्फोट केला . यावरून राज्य़ात सध्या गोधळाचे वातावरण पसरले आहे. पहाटेचा शपथविधी झाला त्याच्या काही दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात 40 मिनिटे गहन चर्चा झाली होती.
राज्यात सत्तेत वाटा आणि केंद्रात दोन मंत्र्याची ऑफर असल्याचेही फडणवीसांनी सांगितले. सुरुवातीला राष्ट्रवादींनी ऑफर आल्या नाहीत अस सांगितलं. नंतर मात्र ऑफर होती अस मान्य केलं. फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर पवार कुटुंबीयांनी याबाबत टीका केली आहे. फडणवीसांनी ऑन कॅमेरा बोलायला हवं होत असे सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. तर लोकांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला. तर देवेंद्र सुसंस्कृत, सभ्य माणूस आहे. अशाप्रकारे ते बोलतील अस वाटल नव्हत अस शरद पवार यांनी म्हटलय.फडणवीसांनी असा गौप्यस्फोट करण्याची प्राथमिक कारणे काय असावी हे जाणून घेऊया.
गौप्यस्फोट काय केला
1)पहाटेचा शपथविधी पवारांच्या सूचनेनुसारच
2) राष्ट्रपती शासन उठवण्याचं राष्ट्रवादीचं पत्रही मीच ड्राफ्ट केलं.
फडणवीसांच्या विधानामागचं कारण काय?
मतदारांच्या मनात संभ्रम तयार करणं.
फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे खरंच घटना घडल्या असतील का?
कोणाच्यातरी सांगण्यावरून शपथविधी झाला असं सांगण
भाजप आणइ राष्ट्रवादीच्या भविष्यातील युतीची पायाभरणी करणं
शिवसेनेत अस्वस्थता निर्माण करणं.
शरद पवारांसोबत सलगी नाही अस दाखवणं.
Previous Articleमाध्यान्ह आहार देणाऱ्या स्वयंसाहाय्य गटांना 3.75 कोटी फेडणे बाकी
Next Article बेळगाव शहर पाणीपुरवठ्यात 17, 18 रोजी पुन्हा व्यत्यय








