कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात ८४. ३३ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदी पातळीत वाढ होत आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदी २१ फुटांवर वाहत असून २८ बंधारे पाण्याखाली आहे
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, पेंडाखळे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- मांडूकली, शेणवडे, कळे व वेतवडे, धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे व चिखली असे २७ बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४२.४५ दलघमी, वारणा ३५३.०३ दलघमी, दूधगंगा २१९.६५ दलघमी, कासारी ३४.३० दलघमी, कडवी २६.१० दलघमी, कुंभी ३५.०१ दलघमी, पाटगाव ४२.५३ दलघमी, चिकोत्रा १९.७६ दलघमी, चित्री १८.४७ दलघमी, जंगमहट्टी १४.६५ दलघमी, घटप्रभा ४२.६१ दलघमी, जांबरे १०.१४ दलघमी, आंबेआहोळ १९.२५, कोदे (ल.पा) ५.८३ दलघमी असा आहे.