‘भाषा’ हे मानवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्या आहे. भाषा विकसीत झाल्यामुळेच मानव प्रजातीत मोठी उत्क्रांती घडून आली आहे. अनेक मानवसमूहांनी अनेक भाषा निर्माण केल्या. त्यांच्यापैकी अनेक भाषा आज नामशेष झाल्या आहेत. तर काही भाषा लुप्तच झाल्या आहेत. त्यांच्यासंबंधी काहीही आज माहिती नाही. मात्र, काही जुन्या भाषा, ज्या हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्या आहेत, त्या आजही लिहिल्या, वाचल्या किंवा बोलल्या जातात. अशा सात पुराणकालीन भाषा आहेत.
संस्कृत ही भारतनिर्मित भाषा जगातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक आहे. याच भाषेत जगातील प्रथम काव्य रुग्वेदाच्या रुपाने निर्माण झाले आहे. या भाषेमध्य विपुल साहित्याची निर्मिती झाली असून चार वेद, पुराणे उपनिषदे, ब्राम्हणे, अरण्यके, रामायण, महाभारत, विविध नाटके आदी साहित्याने ही भाषा समृद्ध आहे. ती सध्या व्यवहारी भाषा नसली तरी लिहिली आणि शिकली जाते. तामिळ भाषेची मूळ भाषा 5 हजार वर्षांपूर्वीची मानली जाते. ही भाषा दक्षिण भारतातली द्रविडी भाषांमधील सर्वात जुनी आहे. चीनी भाषेला 3,000 वर्षांचा इतिहास आहे. ज्यू लोकांची हिब्रू भाषाही 3 सहस्र वर्षांपूर्वीची आहे. तसेच ग्रीकांच्या लॅटिन भाषेलाही 3 हजार वर्षांचा इतिहास आहे. या भाषांसह अरबी आणि फारशी याही भाषा आहेत. त्यांना 1,500 ते 2,500 वर्षांचा इतिहास आहे. या सर्व भाषा अशा आहेत, की, ज्या अत्यंत जुन्या असूनही आजही उपयोगात आहेत. आपला इतिहास कसा होता, याची माहिती आपल्याला याच भाषांमुळे प्राप्त झाली आहे.









