दररोज रस्त्यावर असंख्य वाहने ये जा करत असत.त्यांचे आकार,ब्रँड, रंग आणि किंमत नेहमीच लक्ष वेधून घेतात.मात्र यासोबतच गाड्यांवरील असणाऱ्या वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स कडे तुमचं कधी लक्ष गेलं आहे का?अशा विविध रंगाच्या नंबर प्लेट तुम्ही जर पाहिल्या असतील तर तुम्हालाही अनेकदा प्रश्न पडला असेल पांढऱ्या, पिवळ्या, हिरव्या रंगाच्या नंबर प्लेटचा अर्थ नेमका आहे तरी काय? विविध रंगाच्या नंबर प्लेटमागे नेमकं रहस्य काय आहे? हे जाणून घेऊयात.
भारतातील गाड्यांसाठी जवळपास सहा रंगाच्या नंबर प्लेट्स असतात. यात पांढरा, पिवळा, लाल, हिरवा, काळा आणि निळा रंगाच्या नंबर प्लेटचा समावेश होतो. या सर्व रंगीत नंबर प्लेटचे असण्यामागे एक विशेष कारण लपलेले आहे.
पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट
पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ खासगी वाहनांसाठी दिली जाते. जर तुमच्या घरी जर एखादं वाहन असेल तर त्याची नंबर प्लेट बहुतांश वेळी पांढऱ्या रंगाची असते.
पिवळ्या रंगाची नंबर प्लेट
पिवळ्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ सार्वजनिक आणि व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांसाठी वापरली जाते. म्हणजेच बस, टॅक्सी, कॅब, ऑटो रिक्षा यासारख्या सार्वजनिक वाहनांवर पिवळ्या रंगाची नंबर प्लेट लावली जाते. त्यासोबतच व्यावसायिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरही पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असते. यात ट्रेलर, ट्रक, मिनी ट्रक यासारखे माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांकडे व्यावसायिक वाहनचालकाचा परवाना असणे आवश्यक आहे.
हिरव्या रंगाची नंबर प्लेट
गेल्या काही दिवसांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली आहे.या इलेक्ट्रिक वाहनांवर केवळ हिरव्या रंगाची नंबर प्लेट लावली जाते. ही नंबर प्लेट खासगी आणि व्यावसायिक वाहनांवर लावली जाते. पण या नंबर प्लेटवरील अंक हे त्या त्या वर्गवारीनुसार लावले जातात. म्हणजे जर एखादे इलेक्ट्रीक वाहन हे खासगी असेल, तर त्यावरील अंक हे पांढरे असतात. तर जी कारही व्यावसायिक असेल त्यावरील अंक हे पिवळ्या रंगाचे असतात.
काळ्या रंगाची नंबर प्लेट
काळ्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ भाड्याने दिलेल्या व्यावसायिक वाहनांवर पाहायला मिळते. अनेक भाड्याच्या कारवर काळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स असतात. ज्यावर पिवळ्या रंगात क्रमांक लिहिला जातो.
लाल नंबर प्लेट
लाल रंगाची नंबर प्लेट ही फक्त राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या गाड्यांसाठी राखीव ठेवलेली असते. या नंबर प्लेटमध्ये क्रमांकाऐवजी अशोक चक्र असते. याशिवाय लाल रंगाची नंबर प्लेट ही एखाद्या कार निर्माती कंपनी चाचणी किंवा प्रमोशनसाठी रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांवरही असते. या वाहनांना त्यावेळी तात्पुरता नंबर दिला जातो.
निळ्या रंगाची नंबर प्लेट
परदेशी प्रतिनिधींसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर निळ्या रंगाची नंबर प्लेट वापरली जातात. या गाडीतून केवळ परदेशी राजदूत प्रवास करु शकतात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









