युरोप आणि अमेरिकेत वाढता प्रकार
युरोप आणि अमेरिकेत मागील काही वर्षांमध्ये आईसाठी एका वेगळ्या प्रकारचा शब्द वापरला जाऊ लागला आहे आणि हा शब्द बोनस मदर आहे. अखेर कुठल्या आईसाठी या संज्ञेचा वापर होतोय हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरले आहे. युरोप आणि अमेरिकेत याचा वापर काही वर्षांपूर्वी सुरू झाला आणि आता तो मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे.
बोनस मदर हा शब्द पाश्चिमात्य देशांमध्ये सावत्र आईसाठी केला जातोय. स्वत:च्या पतीच्या पहिल्या विवाहातून झालेल्या अपत्यांची देखभाल करणाऱ्या महिलांसाठी हा शब्द वापरण्यात येतोय. बोनस मदर शब्दाचा वापर स्वत:च्या जोडीदाराच्या पहिल्या विवाहातून झालेल्या मुलांसोबत राहणारी परंतु त्याच्यासोबत विवाह न करणाऱ्या महिलेसाठी देखील केला जात असतो.
बोनस मदर अन् सावत्र आईतील फरक
बोनस मदर आणि सावत्र आई यात काही महत्त्वपूर्ण अंतर आहे. बोनस मदर शब्दात एक सकारात्मक अर्थ आहे, तर सावत्र आई या शब्दात नकारात्मक अर्थ काढला जाऊ शकतो. हा शब्द आधुनिक कौटुंबिक संरचना दर्शविणारा आहे, ज्या समाजात घटस्फोट आणि पुनर्विवाह सामान्य बाब आहे अशा ठिकाणी हा शब्द प्रचलित आहे. तसेच सावत्र मुलांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महिलांना सन्मानित करणारा हा शब्द आहे.

बोनस मदर होण्याची अनेक कारणे असू शकतात. काही महिला स्वत:च्या साथीदाराच्या पहिल्या विवाहातून झालेल्या मुलांवर प्रेम करतात, त्यांची देखभाल करू इच्छितात. काही महिला स्वत:च्या साथीदाराच्या मुलांना एक स्थिर आणि प्रेमळ घर देऊ इच्छितात.
आव्हानात्मक देखील…
बोनस मदर होणे एक आव्हानात्मक काम असू शकते. बोनस मदरला स्वत:च्या साथीदाराच्या पहिल्या विवाहातून झालेल्या मुलांसोबत एक नाते निर्माण करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते. बोनस मदरला स्वत:च्या साथीदाराच्या पहिल्या विवाहातून झालेल्या मुलांच्या आईवडिलांसोबत देखील काम करावे लागते.
या शब्दाचा अर्थ
बोनस मदर शब्द अपेक्षाकृत नवा आहे. याच्या अचूक इतिहासाबद्दल सांगणे अवघड आहे. परंतु हा शब्द मागील दोन दशकांमध्ये अमेरिका आणि युरोपमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये 1990 च्या दशकानंतर या शब्दाचा वापर वाढला. त्यावेळी तेथे घटस्फोट आणि पुनर्विवाह वाढू लागले होते किंवा जोडीदारासोबत राहण्याचा प्रकार वाढू लागला होता. आशियाई देशांमध्ये सध्या या शब्दाचा वापर फारसा केला जात नाही.









