हिवाळ्याच्या दिवसात पाणी खूप कमी प्रमाणात पिले जाते. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक रोगांना फुकटच आमंत्रण मिळू शकते. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. हिवाळ्यात, जर योग्य फळांचे सेवन केले तर तुमची प्रतिकारशक्ती देखील वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊयात हिवाळ्यात कोणती फळे खावीत.
सफरचंदाचा हंगाम हिवाळ्यात असतो. रोज सफरचंद खाल्ल्याने शरीर आजारांपासून दूर राहते. सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
थंडीच्या दिवसात तुम्ही रोज एक डाळिंब खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरातीलरक्त वाढते. डाळिंब रक्त पातळ करते, ज्यामुळे रक्तदाब, हृदय, वजन कमी आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
थंडीमुळे अनेकजण पेरू खात नसले तरी. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट घटक आढळतात, ज्यामुळे आपले शरीर कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी तयार होते. दुपारच्या वेळेत तुम्ही पेरू खाऊ शकता.
संत्रे हे व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. संत्री खावीत.संत्रे शरीर आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते
हिवाळ्याच्या दिवसात संत्रे आणि मोसंबी हि फळे सहज उपलब्ध होतात. यामध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. रोज मोसंबीचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते .
टीप – हंगामानुसार कोणताही आहार सेवन करताना किंवा आहारात बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









