उन्हाळ्यातील उष्णतेवर मात करण्यासाठी काही फळ तुम्ही आवर्जून खावीत.उन्हाळ्यात दररोज पाणीयुक्त फळांचे सेवन केल्याने निरोगी त्वचा मिळण्यास मदत होईल. यासाठी योगदान देणारी काही उन्हाळी फळे जाणून घ्या.
कलिंगड हे असे फळ आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते.ज्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास हे फळ मदत करू शकते. त्याचबरोबर त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे ए आणि सी असतात, जे तुमच्या त्वचेचे सूर्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात. या फळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ ठेवण्यास मदत करते.
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लॅकबेरी यांसारख्या बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी भरपूर असतात, जे तुमच्या त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवण्यास आणि तरुण दिसण्यास मदत करतात. हे रसाळ बेरी तुमची त्वचा उजळ करण्यास मदत करते आणि कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते.
पपईमध्ये पपेन भरपूर प्रमाणात असते, एक एन्झाइम जो त्वचेला एक्सफोलिएट करण्यास आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतो.
उन्हाळ्यात आंबा मोठ्या प्रमाणात मिळतो.आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे कोलेजन तयार करण्यास मदत करते, जे तुमची त्वचा मजबूत आणि तरुण ठेवते.त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे तुमच्या त्वचेच्या पेशींना नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढायला मदत करतात.
अननसात ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम असते, जे त्वचेतील जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









