Bharat Jodo Yatra : राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे दोन्ही नेते कॉंग्रेस पक्षाची संपत्ती असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. आज (सोमवारी) इंदूरजवळ पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहूल गांधी म्हणाले, “ राजस्थानच्या या दोन्ही नेत्यामध्ये सुरू असलेल्या वादामुळे ‘महाराष्ट्रात असलेल्या भारत जोडो यात्रेवर कोणताही परिणाम झाला किंवा होणार नाही,”
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्या विरोधात काँग्रेस हायकमांड जवळ तीव्र आक्षेप नोंदवून त्यांना “पक्षद्रोही (गद्दार)” म्हणून संबोधले होते. सचिन पायलट काही महिन्यांपुर्वी भाजपबरोबर जाणार अशी चर्चा होती. यावर पायलट यांना 10 आमदारांचाही पाठिंबा नाही, असे सांगून गेहलोत म्हणुन सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री होऊ शकत नाही.
Previous Article‘महागाई’च्या मुद्याला फाटा देण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ची चर्चा
Next Article ‘कोल्हापूर अर्बन’च्या अध्यक्षपदी शिरिष कणेरकर








