कोल्हापूरः
मी ज्याला खांद्यावर घेतलं त्याचा मी पराभव करत नाही. उलट त्याचं कौतुक करून त्याला मोठं करतो. पण ते कौतुक भोगणं त्याच्या नशीबात नसेल तर तो मातीमोल करून टाकायची हिंमत महाडिकांच्या घराण्यात आहे. महाडिक काय वाटेल ते करू शकतो, अशी प्रतिक्रिया महादेवराव महाडिक यांनी दिली.
विधान सभा निवडणूकीत भाजपचे अमल महाडिक विजयी झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
लाडक्या बहिणींमुळे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. कोल्हापूरच्या जनतेने सतेज पाटलांचे स्वप्न धुळीस मिळवले अशीही प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.








