मुंबईतील प्रदूषण वाढल्याने मुंबई महानगरपालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या सूचना बऱ्यापैकी प्रदूषण कमी करणाऱ्या असल्या तरी त्या जुन्याच असल्याचा आरोप वातावरणावर काम करणाऱ्या संघटना करत आहेत. 2016 मध्ये मार्गदर्शक सूचना प्रदूषण वाढले की पुन्हा जारी केल्या जातात. तोपर्यंत आहे त्या स्थितीत शहरवासीय श्वास घेत असतात. 2019 मध्ये मुंबई स्वच्छ हवा कृती आराखडादेखील तयार करण्यात आला. त्यावरील अंमलबजावणीच्या नन्नाच्या पाढ्यांमुळेच शहरातील प्रदूषण श्वास रोखत आहे, त्याचे काय? जगभरात प्रदूषणामुळे अनेक शहरांमध्ये प्रदूषण इमर्जंसी घोषित करण्यास सुऊवात झाली आहे. अशी इमर्जन्सी घोषित होईपर्यंत मुंबईकरांनी वाट पाहत रहावी का?
मुंबईत सध्या धूळ, धूर, प्रदूषके असा मिश्र मारा सुऊ आहे. मुंबईकरांच्या आरोग्य तक्रारी देखील वाढल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने त्वरीत कृती कऊन मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कठोर कारवाई करणार असे मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सूचना दिल्या आहेत.

वातावरणच बिघडल्याने बांधकाम आणि प्रदूषणाशी संबंधित सरकारी तसेच खासगी संघटनांची बैठक घेण्यात आली. महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार धूळ उडू नये म्हणून पाणी शिंपडण्यापासून ते किती मीटर उंचीच्या बांधकामांना किती मीटर उंचीचे कंपाऊंड राहायला हवे याच्या सूचना दिल्या आहेत. यात 70 मीटरपेक्षा आणि एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पाभोवती किमान 35 फूट उंचीचे तर एका एकरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान 25 फूट उंचीचे आच्छादनाची सूचना करण्यात आली आहे. त्याचवेळी सर्व बांधकामाधीन इमारतींना सर्व बाजूंनी हिरवे कापड, ज्यूट, ताडपत्रीने पूर्णपणे झाकून बंदिस्त करणे बंधनकारक आहे. त्याचवेळी कोणतेही बांधकाम पाडताना सातत्याने पाणी शिंपडत राहावे किंवा फवारणी करत राहावी. तर बांधकाम साहित्य चढवताना आणि उतरवताना त्यावर पाण्याची फवारणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकलेली असावीत. बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सर्व बाजूंनी सीसीटीव्ही
कॅमेरे लावून वाहनांमध्ये वजन मर्यादा पाळून साहित्य नेल्याची खातरजमा करणे आवश्यक आहे. प्रत्येक कामाच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायू प्रदूषण संनिरीक्षण प्रणाली सज्ज ठेवण्याच्या सूचना यात करण्यात आल्या आहेत. ग्राइंडिंग, कटिंग, ड्रिलिंग, सॉइंग आणि ट्रिमिंगचे काम बंदिस्त भागात करावीत. जेणेकऊन उडणारी धूळ हवेत मिसळणार नाही. साहित्य उतरवल्यानंतर, वाहन धुणे आवश्यक आहे. वाहनांकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. बांधकाम, पाडकाम साहित्य चोऊन टाकणाऱ्या कृतीवर अंकुश आणण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून हेच लोक वायू प्रदूषण कमी करण्याच्या कामावर देखरेख करतील. यात दोन (वॉर्ड) अभियंता, एक पोलिस, एक मार्शल या टिमला एक वाहनदेखील देण्यात आले आहे.
या पथकाचे नेतफत्व हे विभाग कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी करणार आहेत. तर विभागस्तरावर लहान विभाग असल्यास प्रत्येक विभागासाठी दोन पथके, मध्यम विभागासाठी प्रत्येक विभागासाठी चार पथके तसेच मोठ्या विभागातील प्रत्येक विभागासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचवेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिनाभराच्या कालावधीत दररोज बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ, टाटा पॉवर आणि औद्योगिक वसाहत क्षेत्रातील उद्योग ठिकाणांहून उत्सर्जित होण़ाऱ्या वायू प्रदूषणाचे निरीक्षण करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचा मारा पाहता मुंबईत प्रदूषण इतके वाढले आहे का किंवा यापूर्वी मुंबईत प्रदूषण नव्हते का? जर होते तर ते रोखण्यास या सूचनांचा वापर यापूर्वीच का नाही केला? असे अनेक प्रश्न मुंबईकरांना पडले. मात्र महापालिकेने जारी केलेल्या गाईडलाइन वर वातावरणावर अभ्यास तसेच निरीक्षण मांडणाऱ्या संस्था आणि अभ्यासकांनी वेगळीच मते मांडली. या सूचना जुन्याच असल्याचा आरोप ग्रीनपीस संस्थेचे भगवान केसभट्ट यांनी केला. ज्या वर्षी या सूचना मांडल्या त्याच वर्षीपासून अंमलबजावणीस सुऊवात झाली असती तर आतापर्यंत मुंबईचे चित्र वेगळे दिसले असते. तसे पाहिल्यास मुंबईचे समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या महत्त्वाच्या स्थानामुळे या शहरात होणाऱ्या प्रदूषणाचे वहन त्वरीत होत असल्याचे हवामानतज्ञ देखील सांगतात. या ठिकाणी जास्त काळ प्रदूषण टिकतच नाही. मात्र सध्या होणारे प्रदूषणात धूळीचाच भाग अधिक असल्याने यावर पाण्याचा मारा करण्यास महापालिकेकडून सुचविण्यात आले आहे.
मार्गदर्शक सूचनांवर बोलताना केसभट्ट यांनी जुन्याला नवा मुलामा अशी टिपणी केली आहे. शासनाने सध्या ज्या काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या बांधकामांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आहेत. या काही नव्या गाईडलाईन्स नसून 2016 मध्येच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सूचवलेल्या सूचना आहेत. मुंबई महानगरपालिकेने त्याच पुन्हा एकदा जारी केल्या आहेत. यात नवे काही नसून पुन्हा अंमलात आणण्यासाठी पुन्हा एकदा गाईडलाईन्स आणल्याचे केसभट्ट यांनी मत मांडले. या गाईडलाईन्समुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी कबुल केले. मात्र कोणत्या प्रकारचे प्रदूषण कमी होणार हे देखील पाहिले पाहिजे. सध्या शहरात पायाभूत सुविधांची कामे जोरदार सुऊ असून मेट्रो, मोनो, एमएमआरडीए, म्हाडा प्रकल्प तसेच पुल उभारणी अशी जोरदार प्रकल्प उभारणी सुऊ आहे. या बांधकामांमुळे होणाऱ्या प्रदूषण नियंत्रणासाठी घोषित केलेल्या बहुतांश सूचना लागू होत आहेत. म्हणजे बांधकामांव्यतिरिक्त प्रदूषण होत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंबईत उद्योग धंदे आणि वाहनांच्या वाहतुकीमुळे प्रदूषण होत आहे. या प्रदूषण नियंत्रणाचे काय? यावरील गाईडलाईन्स किंवा ऊपरेखा ठेवल्याच नसल्याचे आरोप होत आहेत. भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातून 10 जानेवारी 2019 मध्ये मुंबई स्वच्छ हवा कृती आराखडा घोषित करण्यात आला. या कार्यक्रमाची सुऊवात केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते सुऊवात करण्यात आली होती.
या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक महानगरपालिकेने 122 शहर शोधण्यात आली. यावर कृती आराखडा बनवणे आवश्यक असल्याने तसा तो दोनदा तयार करण्यात आला. मात्र केंद्रीय मंडळाने रद्द केला. तिसऱ्यांदा 2019 वर्षात मात्र तयार कऊन त्याला मंजुरी मिळाली. मात्र त्यावर अद्याप अंमलबजावणी झाली नाही. या कृती आराखड्यात वाहतूक, पीयुसी तपासणे, मुदत बाह्य वाहनांवर बंदी घालणे, जुन्या गाड्या तपासणे, सार्वजनिक वाहनाला प्रोत्साहन देणे, चालणे तसेच सायकलच्या वापरावर भर देणे, व्यवस्था करणे हे सर्व नियोजनावर पालिकेने काम करणे आवश्यक होते.
हा प्लान अद्याप कागदावरच असल्याचे ग्रीनपीस संस्थेचे भगवान केसभट्ट यांनी सांगितले. अॅक्शन प्लान असतानादेखील अंमलबजावणीवर चालढकल का असा सवालच आता उपस्थित करण्यात येत आहे. अंमलबजावणीच्या नन्नाच्या पाढ्यांमुळेच शहरातील प्रदूषण श्वास रोखत आहे, त्याचे काय? जगभरात प्रदूषणामुळे अनेक शहरांमध्ये इमर्जंसी घोषित करण्यास सुऊवात झाली आहे. अशी इमर्जन्सी घोषित होईपर्यंत मुंबईकरांनी वाट पाहत रहावी का?
राम खांदारे








