हॉट नूडल्स, भात आणि सूप ही चीनची सांस्कृतिक ओळख आहे. परंतु आता या कम्युनिस्ट देशात लोकांच्या आहारासंबंधीची पसंती बदलत आहे. लोक ‘बॅरेनफॅग’ हॅशटॅगसोबत पनीरयुक्त हिरव्या भाज्या, व्हेज सँडविच आणि ग्रीन सॅलड यासारख्या डिश पोस्ट करत आहेत. ‘बॅरेनफॅन’ या चिनी शब्दाचा अर्थ ‘श्वेतवर्णीयांचे भोजन’ असा होतो. चीनमध्ये हा ट्रेंड ऑक्टोबरमध्ये सुरू झाला असून याला आता एक मोठे स्वरुप प्राप्त झाले आहे. अनेक चिनी लोकांनी पाश्चिमात्य आहाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
लाइट फूड
लंडनमधील चिनी रेस्टॉरंट ए. वोंगचे मालक अॅन्ड्य्रू वोंग यांनी पाश्चिमात्य देशांसोबत चीनच्या संबंधांचा इतिहास पाहता हा ट्रेंड अलिकडेच विकसित झाल्याचे म्हटले आहे. काही गोष्टींमागील कारणे समजून घेण्यास वेळ लागतो आणि यात भोजन देखील सामील आहे. पाश्चिमात्य खाद्यपदार्थांमुळे वजन कमी करणे आणि आरोग्य चांगले ठेवण्यास मदत मिळेल असा लोकांचा तर्क आहे. विशेषकरून ऑफिसमध्ये लंचदरम्यान असा हलका आहार वरदान असल्याचे चिनी ब्लॉगमध्ये म्हटले गेले आहे. लोक स्वत:ची कारकीर्द आणि आरोग्याबद्दल सजग होत चालल्याचे या ट्रेंडमधून निदर्शनास येते. पालक सोबत दोन गाजरांनी भरलेल्या लंचबॉक्सचे छायाचित्र शेअर करत एका व्यक्तीने इतक्या कमी आहारासोबत ‘पुरेशी ऊर्जा’ निर्माण करू शकतो का’ असे प्रश्नार्थक विधान केले आहे.
आंतर-सांस्कृतिक मतभेद
हा ट्रेंड आंतर-सांस्कृतिक मतभेद ठळकपणे समोर आणतो. आम्ही लहानपणी कधीच सँडविच किंवा अशाप्रकारच्या खाद्यपदार्थांचा विचारही केला नाही. घरात केवळ चिनी पारंपरिक भोजनच तयार केले जायचे. कारण आमच्या वाडवडिलांना पाश्चिमात्य आहार पसंत नव्हता, असे उद्गार चिनी वंशीय शेफ एडवर्ड वून यांनी काढले आहेत. कुठलीही नवी संस्कृती आणि अनुभवाला चुकीच्या पद्धतीने मांडले जात असल्याने त्याबद्दल प्रतिकूल मत तयार होत असल्याची भूमिका शेफ वोंग यांनी मांडली आहे.
मोठी मागणी
19 व्या शतकाच्या मध्यापासून अखेरपर्यंत शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाने वेग पकडल्याने कर्मचारी आणि कामगारांच्या दुपारच्या भोजनासाठी बाजारपेठा उभ्या राहिल्या. लंच वॅगन, कॉफी शॉप अन् स्वस्त अन् हलका आहार देण्यास सुरुवात झाली. हे खाद्यपदार्थ बाहेर किंवा स्वत:च्या ऑफिसमध्ये खाता येत होते. जग जसजसे अधिक व्यस्त होत जाईल, तसतसे सुविधाजनक सँडविच, सॅलड किंवा आशियाई स्नॅक्सची मागणी वाढत जाणार असल्याचे फूड हिस्टोरियन आणि ‘लंच : ए हिस्ट्री’ पुस्तकाच्या लेखिका मेगन एलियास यांनी म्हटले.









