वृत्तसंस्था / इस्लामाबाद
तब्बल 18 वर्षांनंतर विंडीजचा क्रिकेट संघ पाकमध्ये पहिली कसोटी मालिका खेळण्यासाठी सोमवारी येथे दाखल झाला. 2006 साली विंडीज आणि पाक यांच्यात शेवटची कसोटी मालिका खेळविली होती.
विंडीज आणि यजमान पाक यांच्यातील पहिली कसोटी 17 जानेवारीपासून मुल्तानमध्ये होणार आहे. तत्पूर्वी म्हणजे 10 जानेवारीपासून विंडीजचा संघ तीन दिवसांचा सरावाचा सामना पाकिस्तान शाहीन संघाबरोबर इस्लामाबादमध्ये खेळविणार आहे. उभय संघातील दुसरी कसोटी 25 जानेवारीपासून मुल्तानमध्ये होणार आहे.
विंडीज संघ – क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), अॅलीक अथानझे, कार्टी, जोशुआ डिसिल्वा, ग्रिव्हेस, हॉज, इमालेच, अमिर जंगू, लुईस, गुदाकेश मोती, फिलीप, केमर रॉच, जायडेन सेल्स, सिंक्लेअर आणि व्हॅरीकेन









