वृत्तसंस्था/ सेंट जोन्स (अँटिग्वा)
इंग्लंडचा दौरा संपवून आता भारतीय क्रिकेट संघ विंडीजमध्ये तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. ही मालिका त्रिनिदादमध्ये होणार असून क्रिकेट विंडीजने रविवारी या मालिकेसाठी 13 जणांचा संघ जाहीर केला. या दौऱयात भारत आणि विंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिकाही खेळविली जाणार आहे.
विंडीजच्या वनडे संघाचे नेतृत्व निकोलास पुरनकडे सोपविण्यात आले असून शाय हॉप उपकर्णधार राहील. या दौऱयात वनडे मालिकेसाठी भारताचे नेतृत्व शिखर धवन करीत आहेत. तर टी-20 मालिकेसाठी भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे राहील. भारत आणि विंडीज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 22 जुलैपासून खेळविली जाईल. या मालिकेतील सामने 22, 24 आणि 27 जुलै रोजी क्विन्सपार्क ओव्हल मैदानावर होणार आहेत. या वन डे मालिकेनंतर उभय संघातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 29 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. विंडीजच्या निवड समितीने अनुभवी अष्टपैलू तसेच माजी कर्णधार जेसॉन होल्डरचा संघात समावेश केला आहे.
विंडीज वन डे संघ- निकोलास पुरन (कर्णधार), शाय हॉप (उपकर्णधार), ब्रुक्स, कार्टि, जेसन होल्डर, अकिल हुसेन, अलझेरी जोसेफ, ब्रेंडॉन किंग, कायली मेयर्स, मॉटी, किमो पॉल, आर. पॉवेल, सिलेस, राखीव- शेफर्ड आणि हेडन वॉल्श ज्युनियर.
भारत वन डे संघ- शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभम गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किसन, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शिराज आणि अर्षदीप सिंग.
भारत टी-20 संघ- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किसन, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवि बिष्णोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल आणि अर्षदीप सिंग.









