वृत्तसंस्था/सेंट जोन्स
चालु महिन्याच्या अखेरीस बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणाऱ्या विंडीज संघाची घोषणा करण्यात आली. विंडीज संघामध्ये अकिम ऑगेस्टी या एकमेव नव्या चेहऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. विंडीजच्या 19 वर्षांखालील वयोगटातील संघाचे नेतृत्व ऑगेस्टीने केले होते. बांगलादेशच्या दौऱ्यात विंडीजचा संघ तीन सामन्यांची वनडे मालिका तसेच त्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. विंडीजच्या बांगलादेश दौऱ्यातील कार्यक्रमाला 18 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या दौऱ्यासाठी विंडीजच्या टी-20 आणि वनडे मालिकेसाठी शाय हॉपकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी विंडीजचे दोन स्वतंत्र संघ जाहीर करण्यात आले असून गुदाकेश मोती, एस. रुदरफोर्ड, जायडेन सिलेस, रोमारिओ शेफर्ड आणि ब्रेन्डॉन किंग यांचा दोन्ही संघात समावेश आहे. मात्र विंडीजच्या 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार अकिम ऑगेस्टी हा या संघातील एकमेव नवा चेहरा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसीच्या पुरूषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्याचप्रमाणे 2027 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी विंडीज संघाच्या पुनर्बांधणीला आतापासूनच सुरूवात झाली आहे.
विंडीज वनडे संघ : शॉय हॉप (कर्णधार), अथांझे, ऑगेस्टी, ब्लेड्स, कार्टी, रोस्टन चेस, जस्टीन ग्रिव्हेस, अमिर जंगु, शमार जोसेफ, ब्रेन्डॉन किंग, गुदाकेश मोती, के. पियरी, एस. रुदरफोर्ड, जायडेन सिलेस आणि शेफर्ड.
विंडीज टी-20 संघ : शॉय हॉप (कर्णधार), अथांझे, ऑगेस्टी, रोस्टन चेस, जेसेन होल्डर, अकिल हुसेन, अमिर जंगु, शमार जोसेफ, ब्रेन्डॉन किंग, गुदाकेश मोती, रोव्हन पॉवेल, एस. रुदरफोर्ड, जायडेन सिलेस, रेमन सिमॉड्स आणि शेफर्ड.
सामन्यांचे वेळापत्रक
- पहिली वनडे 18 ऑक्टोबर-मिरपूर
- दुसरे वनडे 21 ऑक्टोबर-मिरपूर
- तिसरे वनडे 23 ऑक्टोबर मिरपूर
- पहिला टी-20 27 ऑक्टोबर-चेतोग्राम
- दुसरा टी-20 29 ऑक्टोबर -चेतोग्राम
- तिसरा टी-20 31 ऑक्टोबर-चेतोग्राम









