वृत्तसंस्था/ लंडन
एफए चषक फुटबॉल स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात अॅस्टोन व्हिला संघाने वेस्ट हॅमचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. तिसऱ्या फेरीतील या सामन्यातील पराभवाने वेस्ट हॅम संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
या सामन्यात 9 व्या मिनिटाला वेस्टहॅमचे खाते लुकास पेक्वेटाने उघडले. 19 व्या मिनिटाला ओनानाने अॅस्टोन व्हिलाला बरोबरी साधून दिली. मॉर्गन रॉजर्सने 75 व्या मिनिटाला अॅस्टोन व्हिलाचा दुसरा आणि निर्णायक गोल केला.









