प्रतिनिधी/ बेंगळूर
करदात्यांना आणि व्यावसायिक समुदायाला आर्थिक भार आणि अंमलबजावणीतील अडचणी कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या कर सुधारणा लागू करण्याच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मंडळाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. नरेंद्र मोदी सरकारचा हा नवीन प्रयोग नाही, अशी टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी केली.
सिद्धरामय्या पुढे म्हणाले, एनडीए सरकारने 2017 मध्ये घाईघाईने सदोष जीएसटी लागू केला. तेव्हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जीएसटीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची मागणी केली होती. ‘गब्बर सिंग कर’ देशातील लहान व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करेल. कर भरण्याच्या पद्धतीची गुंतागुंत आणि खर्चाचा भार त्यांचे जीवन अनेक संकटात अडकवेल, असे आम्ही गेल्या आठ वर्षांपासून म्हणत आहोत. पण नरेंद्र मोदींनी आमचे ऐकले नाही आणि आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत राहिले, असे त्यांनी एका पत्रकात म्हटले आहे.









