पतीला उलटं लटकवून बडविण्याची प्रथा
जगभरात अद्याप अनेक अजब प्रथापरंपरांचे पालन केले जाते. जगातील विविध देशांमध्ये होणाऱया विवाहांमध्येही अनेक प्रकारच्या परंपरांचे पालन करण्यात येते. विवाहावेळी करण्यात येणाऱया विधींचे वेगळेच महत्त्व असते. दक्षिण कोरियात मात्र अजब प्रथेचे पालन केले जाते. या देशात विवाहादम्यान नवऱयामुलाला पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी मारहाण सहन करावी लागते.
दक्षिण कोरियात विवाहानंतर पतीला लाकडाशी बांधून उलटं लटकविले जाते. त्यानंतर पतीच्या पायांयच तळव्यांवर काठय़ांनी मारहाण केले जाते. याचबरोबर त्याला पादत्राणांनीही बडविण्यात येते. या परंपरेचे पालन करण्याचे एक मोठे कारण आहे. दक्षिण कोरियातील लोकांनुसार या परंपरेत नवरा मुलगा उत्तीर्ण झाल्यास त्याला आगामी काळात कुठलीच समस्या उद्भवत नाही. विवाहाच्या प्रारंभीच मार खाल्ला असल्याने पूर्ण जीवन तो मजबूत राहू शकतो असे तेथील लोकांचे मानणे आहे.
दक्षिण कोरियात ही परंपरा लोक अत्यंत आनंदाने पूर्ण करत आहेत. नवऱयामुलाचे मित्रच त्याला उलटं लटकून त्याच्या तळय़ांवर काठय़ांनी मारहाण करत असतात. दक्षिण कोरियाप्रमाणेच अनेक देशांमध्ये अजब प्रथापरंपरांचे पालन केले जात असते.
दक्षिण कोरियात विवाह सोहळय़ांमध्ये अधिकाधिक लोकांच्या सहभागाला त्यांच्या प्रतिष्ठेशी जोडून पाहिले जाते. विवाहसोहळय़ात जितके अधिक लोक येतील तितके कुटुंब प्रसिद्ध असल्याचे मानण्यात येते. याचमुळे येथील लोक समाजात स्वतःचे नाव उंचाविण्यासाठी पैसे देऊन लोकांना विवाहसोहळय़ात बोलावत असतात. याकरता तेथे एजेन्सींची मदतही घेतली जात असते.