मंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना नियमात शिथिलता देण्यात आली असली तरी वीकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यू लागू आहे. दरम्यान शनिवार व रविवारच्या लॉकडाऊनमुळे, मंगळूर विद्यापीठाने (एमयू) १४ आणि २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीपूर्व (यूजी आणि पीजी) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंगळूर विद्यापीठाचे कुलसचिव (मूल्यांकन) प्रा. पी. एल. धर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सुधारित तारखा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि महाविद्यालयांमध्ये १२ ऑगस्ट रोजी जाहीर केल्या जातील. इतर परीक्षांमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मंगळूर विद्यापीठाने बुधवारपासून पीजी आणि यूजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा सुरू केल्या आहेत.
जी अभ्यासक्रमांमध्ये ५१ विषयांसाठी आणि पीजी अभ्यासक्रमांमध्ये ५३ विषयांसाठी परीक्षा घेण्यात आल्या. ४३,८६४ नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ४१,९८९ विद्यार्थ्यांनी यूजी परीक्षा दिली होती. पीजी अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केलेल्या ५,७३२ विद्यार्थ्यांपैकी ५,६७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, असे कुलसचिवांनी सांगितले आहे.