'विकी कौशल'ने आपल्या कुटुंबासोबत साजरी केली धुळवड

अभिनेता 'विकी कौशल'ला पत्नी अभिनेत्री 'कतरिना कैफ' हीने रंग लावताना व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला

'विकी कौशल'ने धुळवडीनिमित्त कुटुंबियांसोबत रंगांची उधळण केली

विकी कौशलच्या 'छावा' हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. विकी 'छावा' चित्रपटाच्या यशाचा आनंद  घेत आहे

यंदा छावा च्या यशानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफसाठी होळी खूप आनंदाची होती, दोघांनीही त्यांच्या कुटुंबासह घरीच होळी साजरी केली. कतरिना कैफने तिच्या घरी होळी साजरी केली, यावेळी विकी कौशल, सनी कौशल, इसाबेल कैफ आणि विकी कौशलचे आई-वडिल होते

कतरिना कैफ राजस्थानमधून आयफा अॅवॉर्ड २०२५ मध्ये कार्तिक आर्यन सोबत होस्ट करताना दिसली. 

लक्ष्मण उत्तेकर दिग्दरशित ऐतिहासिक बायोपिक छावा हा चित्रपट मराठा शासक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने ५०० कोटींचा गल्ला ओलांडला असून चित्रपटाचे आणि विकी कौशलच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.