यंदाच्या महाकुंभमेळावा २०२५ मध्ये अनेक प्रसिद्ध लोकांनी सहभाग नोंदवला आहे. शिवाय अनेक हॉलीवूड सेलिब्रेटींनी या कुंभमेळाव्यात हजेरी लावली आहे

अशातच लेखक दिग्दर्शक प्रविण तरडे आणि दिग्दर्शिक स्नेहल तरडे यांनी ही मौनी अमावस्येच्या पवित्र स्नानासाठी प्रयागराजला भेट दिली

प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर प्रविण तरडे आणि स्नेहल तरडे दोघांनीही शाही स्नान केले 

त्यांच्या या भेटीचा व्हिडीओ स्नेहल तरडे यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओला अद्भुत अनुभव.. त्रिवेणी संगम स्नान, २९ जानेवारी २०२५, मौनी अमावस्या, महाकुंभ २०२५, प्रयागराज, उत्तर प्रदेश अशी कॅप्शन दिली होती. 

स्नेहल यांनी नुकताच वेदांचा अभ्यास पूर्ण केला आहे. त्यांनी फुलवंती या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.

धर्मवीर, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव असे एकसेएक हिट सिनेमे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे यांनी दिले आहेत.