अभिनेत्री खुशा कपिला हिने लग्नाच्या ६ वर्षांनी घटस्फोट घेतला. खुशाच्या या निर्णयाचा आईवर गंभीर परिणाम झाला.
आईने घराबाहेर पडणं बंद केलं होते. लोकांच्या विचाराने मंदिरात जाण्याची वेळही बदलली. असे त्यांनी यु ट्यूब वर दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
दरम्यान आईला मंदिरात एका बाईने घटस्फोटाबद्दल विचारणा केली अन् आईला रडूच कोसळले. त्यांना या परिस्थितीत पतीने खूप साथ दिली असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.
कॉमेडी स्टार, सोशल मिडीया इन्फ्लुएन्सर ते अभिनेत्री अशा विविध माध्यमातून खुशाचा प्रवास आहे. २०२३ मध्ये ती घटस्फोटानंतर खूप चर्चेत आली. जोरावर सिंह अहलुवालिया यांच्या सोबतचा ६ वर्षांचा संसार मोडत ती विभक्त झाली.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कॉमेडीयन समय रैना याने खुशाच्या घटस्फोटावरून तिला रोस्ट केले, खुशाने त्याला सोशल मिडीयावर चांगलेच उत्तर दिले. तर इन्स्टाग्रामवरून अनफॉलोही केले.