दोन वर्षांचं नातं संपलं अभिनेत्रीने सांगितले एक तरफी प्रेमाचे कारण.....

अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि अभिनेता विजय वर्मा यांचे ब्रेकअप

काही महिन्यांपूर्वी तमन्ना आणि विजय यांचे दोन वर्षांपासून रिलेशनशीप आहे अशी चर्चा सुरु होती. दोन वर्षांनंतर हे नाते संपुष्ठात आले. 

या ब्रेकअप मागे तमन्नाच्या बाजून लग्नासाठी सतत विचारणा होत होती अशी चर्चाही बी टाऊनमध्ये रंगली होती. पण अखेर अभिनेत्री यावर आपले मौन सोडले.

तमन्ना म्हणाली, "मला वाटतय लोकांच्या प्रेम आणि नाते संबंध यांच्यामध्ये गफलत होते. मी स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधांवरच बोलतीये असे नाही, तर यापलीकडे जाऊन मैत्रीपूर्ण ही संबंध असतात. मी त्याबद्दल बोलतीये. "

" जेव्हा एखादे नाते, शर्तींवर आधारित असते त्याला प्रेम म्हणत नाही. प्रेम हे बिनाशर्तीचे असते. अनेकदा एकतर्फी सुद्धा प्रेम असू शकते किंवा दोन माणसं एकमेकांवर अपार प्रेम करतात असेही असु शकते. " असेही तमन्ना म्हणाली.

याविषयी पुढे तमन्ना म्हणाली, आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, तेव्हा ती व्यक्ती आहे अशी स्विकारची तयारी ही दाखवतो. पण काळानुरुप या नात्यात, संबंधित व्यक्तीमध्ये काय बदल होतात, याचाही परिणाम होऊ शकतो.

तरी अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि विजय वर्मा या दोघांनी ब्रेकअपनंतरही फ्रेण्डझोन ठेवायचे ठरविले आहे.