अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज पहाटे स्पेस ड्रॅगनमधून पृथ्वीवर पोहोचल्या. कॅप्सूल पाण्यात उतरताच ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कॅप्सूल पृथ्वीवर पोहोचताच, ते एका जहाजावर ठेवण्यात आले. बाजूचा हॅच उघडून चारही अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले.