ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री हिना खान हिला जून २०२४ मध्ये  तिसऱ्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. 

तिने सोशल मिडीयावरून तिच्या चाहत्यांना कर्करोगावरील उपचार, उपचारादरम्यानचे तिचे अनुभव, येणारी आव्हाने याबद्दल सांगत आली आहे. तिने उपचारादरम्यान नियमितता आणि सकारात्मकता कायम ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कर्करोगासारखा आजार झाला असतानाही तिने आपले काम सुरु ठेवले होते. 

तिचे केमोथेरपी चालु असतानाही तिने रॅम्पवॉकी ही केला आहे. तिच्या या प्रवासाविषयीचे अपडेटस् ती नेहमी सोशल मिडीयावर शेअर करायची.

कर्करोगाविषयी सोशलमिडीयावरू उघडपणे सांगितल्यामुळे ती अनेकवेळा ट्रोलिंगचा शिकार बनली आहे. तिच्यावर या आजारविषयी नेहमी अपडेटस् देणे हे पब्लिसिटी स्टंट आहे, अशा पद्धतीच्या अनेक टीका झाल्या. पण तिने गैरसमज आणि टिकांना ठामपणे प्रत्युत्तर दिले आहे.

हिना खान चा जन्म काश्मीरी मुस्लिम कुटुंबात २ ऑक्टोबर १९८७ रोजी श्रीनगर जम्मू कश्मिर मध्ये झाला. हिनाच्या कुटुंबात वडील असलम खान, आई आणि भाऊ आमिर खान असे सदस्य आहेत. भाऊ आमिर खान या ट्रॅव्हल्स एज्नसी आहे. हिनाने २००९ मध्ये एमबीए पूर्ण केले.

तिने मुख्यतः हिंदी आणि पंजाबी चित्रपटात काम केले आहे. तसेच ती टेलिव्हीजनवर कार्यरत आहे. भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टिव्ही अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. 

ती ये रिश्ता क्या कहलाता है (2009–2016) या मालिकेत अक्षरा महेश्वरी सिंघानिया या भूमिकेसाठी विशेषतः ओळखली जाते. तिने आपल्या कारकिर्दीत तीन ITA अवॉर्ड्स, तीन इंडियन टेली अवॉर्ड्स आणि सात गोल्ड अवॉर्ड्ससह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

हिनाने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेनंतर फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी (२०१७) आणि बिग बॉस (२०१७-२०१८) या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या दोन्ही शोमध्ये ती उपविजेती ठरली. कसौटी जिंदगी की २ (२०१८-२०१९) या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका साकारली. या भूमिकेची समीक्षकांकडून खूप प्रशंसित झाली.

हिनाला तिच्या या प्रवासात बॉयफ्रेण्ड रॉकी जैसवाल आणि कुटुंबियांनी खूप साथ दिली असल्याचेही तिने सोशल मिडीयावर सांगितले आहे. तसेच ती तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाली आहे.