मला नातीने आजी म्हणून नये, ६५ वर्षाच्या अभिनेत्रीची इच्छा !

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता तिच्या अभिनयासोबत बिनधास्त असण्यासाठीही फेमस आहे

नीना गुप्ता यांना काही महिन्यापूर्वीच नात झाली आहे. फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ता हिने एका गोंडस लेकीला जन्म दिला. 

मसाबाने लेकीच्या जन्माच्या तीन महिन्यानंतर तिचे नाव मतारा असल्याचे सांगत त्याचा विशेष अर्थही शेअर केला. पण मसाबाने अजुनही लेकीची झलक तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलेली नाही.

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एका मुलाखती दरम्यान आपली विशेष इच्छा वर्तविली. त्या म्हणाल्या," जरी मताराच्या जन्माने मी आजी झाले असले तरी तिने मला आजी असे न म्हणता मला नीनाच म्हणावे असे मला वाटते. मला अजूनही मी आजी झाली आहे, असे वाटत नाही."

नीना गुप्ता यांची कन्या मसाबा हिने लग्नाच्या एका वर्षानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला.

नीना गुप्ता त्यांच्या सेकंड इनिंग मध्ये एक-से-एस भूमिका गाजवत आहेत. त्यांना अनेक पुरस्कारानेही गौरविले जाता आहे. 

नीना गुप्ता यांच्या कसदार आणि सहज अभिनयामुळे त्यांच्यासाठी विशेष भूमिका लिहील्या जातात. आणि त्या अतिशय ताकदीने त्या भूमिकांना न्याय मिळवून देतात. 

अभिनायासोबतच नीना गुप्ता सोशल मिडीयावरही खूप अॅक्टीव्ह आहेत. त्यांचे रिल्स, व्हिडीओज् इन्स्टावर खूप लाईक्स मिळवून जातात.