शुक्रवारी मध्य म्यानमारमधील सागाईग शहराच्या वायव्येस ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे.
शुक्रवारी मध्य म्यानमारमधील सागाईग शहराच्या वायव्येस ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे.
देशाच्या या भागात भूकंपाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. येथे भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भूकंपात मृतांचा अकडा १००२ वर पोहोचली आहे, तर २,३७६ लोक जखमी झाले आहेत.
भूकंपात मृतांचा अकडा १००२ वर पोहोचली आहे, तर २,३७६ लोक जखमी झाले आहेत.
म्यानमारच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.५० वाजता ७.७ रिश्टर स्केलचा शक्तीशाली भूकंपाचा धक्का झाला आणि त्यानंतर ६.८ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला. यामुळे संपूर्ण देशात भीतीचा छाया पसरली आहे.
म्यानमारच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.५० वाजता ७.७ रिश्टर स्केलचा शक्तीशाली भूकंपाचा धक्का झाला आणि त्यानंतर ६.८ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला. यामुळे संपूर्ण देशात भीतीचा छाया पसरली आहे.
म्यानमार व्यतिरिक्त उत्तर थायलंड, चीनच्या युनान प्रांतातही भूकंपाचे धक्के जाणवले. यांसह भारतात मणिपूर, पश्चिम बंगाल येथे भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली- एनसीआर, नोएडा आणि गाझियाबादमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, परंतु कोणतेही नुकसान झालेले नाही.
म्यानमार मधील नेपिदाव येथील अनेक ऐतिहासिक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. येथे बौद्ध मठांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. बचाव पथक कडून ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. बॅंकॉकमधील भूकंपाच्या धक्क्यानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर आले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. अनेक ठिकाणी स्विमिंग पूलमधून पाणी वाहून जाण्याचीही घटना घडली.