नव्या आयफोनची भारतातील किंमत

आयफोन 16e च्या बेस १२८ जीबी व्हेरियंटची किंमत ५९ हजार ९०० रुपये असणार आहे. iPhone 16e च्या २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ६९ हजार ९०० रुपये आहे, तर ५१२ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ८९,९०० रुपये आहे

आयफोन १६ई आयफोन १६ लाइनअपमध्ये सामील झाला आहे, ज्यामध्ये A18 चिपची जलद कामगिरी, ॲपल इंटेलिजेंस, असाधारण बॅटरी लाइफ आणि ४८ एमपी २-इन-१ कॅमेरा सिस्टम आहे.

iPhone 16e २६ तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक ऑफर करतो. हे उपकरण वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते आणि त्यात सॅटेलाइट आणि इमर्जन्सी एसओएसद्वारे मेसेज यांसारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्ससुद्धा समावेश करण्यात आला आहे

iPhone 16e मध्ये ६.१ इंचाचा OLED डिस्प्ले, फेस आयडी सिस्टम आहे. ॲक्शन बटणद्वारे युजर्स कॅमेरा किंवा डू नॉट डिस्टर्ब मोड ॲक्टिव्ह करू शकतात. याव्यतिरिक्त फोनमध्ये यूएसबी-सी (USB-C) पोर्टसुद्धा असणार आहे.

iPhone 16e मध्ये सिंगल ४८ एमपी फ्यूजन रियर कॅमेरा दिला आहे, जो हाय-रिझोल्यूशनसह फोटो कॅप्चर करेल. कॅमेरा सिस्टमला 2x टेलिफोटो झूम पर्याय दिला आहे, ज्यामुळे युजर्सना मूळ फोटोची क्वाॅलिटी राखून अगदी फोटो झूम करून सहज काढता येऊ शकतो