कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर ही मुळची सिंधुदुर्गची आहे. एमआयटीएम इथून सिव्हील इंजिनिअरींग शिक्षण पूर्ण केले आहे. तिला इस्टाग्रामवर ५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
Fill in some teबिग बॉस फेम अंकिता वालावलकर ही सोशल मिडीया इन्फ्लुएन्सर आहे. ती कॉन्टेंट क्रिएटर, सोशल वर्कर, उद्योजिका, शिक्षिका, इंजिनिअर, यु ट्युबर आणि एका रिसॉर्टची मालक अशा विविध टॅगचे ओळखली जाते. ती Sindhudyog नावाचा ब्रॅण्ड चालवते, शिवाय तिचे समुद्र किनारी रिसॉर्टही आहे. ती कोकण हार्टेड गर्ल Kokanheartedgirl या नावाने सोशल मिडीय इन्फ्लुएन्सर म्हणूनही ओळखली जाते. xt
अंकिता तिच्याहून १० वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. पण काही घटनां अशा घडल्या की, तिने या नात्यातून मोकळे व्हायचे ठरवले. आणि त्यांनी ब्रेकअप केले. या ब्रेकअपनंतर अंकिताला खूप त्रास झाला. अशातच तिने अतिशय कष्टाने तिचे इन्स्टा हॅण्डेल कोकणहार्टेडगर्ल हे तयार केले. आणि ती मराठी मधील एक प्रसिद्ध कॉन्टेण्ट क्रिएटर झाली.
अंकिताने सुरुवातीला टिकटॉकवर व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. पण भारतात टिकटॉकवर बंदी आल्यानंतर तिेने इन्स्टाग्रामवर आपले व्हिडीओ अपलोड करायला सुरुवात केली. तिने तिच्या वडिलांना एक ब्रॅण्डेड टी-शर्ट गिफ्ट केलेला व्हीडीओ खूप व्हायरल झाला.
अशातच अंकिताचे कुणाल भगत सोबत सुर जुळले. अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सोशल मिडीया सस्पेन ठेवला होता. अखेर दसऱ्याच्या मुहुर्तावर तिने फॉलोअर्सना तिचा होणारा नवरा कुणाल भगतचा म्हणजेच कोकणचा जावाई KokanchaJawai फोटो शेअर केला. अंकिताच्या मेहेंदीला डीपी दादा सह अनेक मित्रपरिवाराने उपस्थिती लावली आहे. व्हॅलेटाईन्स डे ला अंकिताची मेहेंदी झाली. १५ फेब्रुवारीला हळदीचा समारंभ आहे. तर १६ फेब्रुवारीला लग्नसोहळा संपन्न होणार आहे.