Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुढील चार दिवस कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या १३ सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज सकाळी ११ नंतर कोल्हापुरात पावसाला सुरुवात झाली आहे.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे. पावसाचा जोर हा पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसारख्या किनारी जिल्ह्यांतील निर्जन भागात शुक्रवार ते रविवार या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. तर आज सकाळपासूनच काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








