उन्हाळय़ामुळे वकिलांना उच्च न्यायालयाकडून मुभा
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटकात बहुसंख्य जिल्हय़ांमध्ये उष्णतेची लाट आली असून काही जिल्हय़ांमध्ये पारा अधिक झाला आहे. त्यामुळे वकिलांना कोट घालून न्यायालयात काम करणे असहय़ झाले आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत असल्यामुळे घालमेल वाढली असून उच्च न्यायालयाने कोट घाला किंवा गळपट्टी, काळा टाय किंवा कॉलरचा वापर करून न्यायालयातील कामकाज करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे वकिलांना उष्म्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली आहे. या उन्हामुळे साऱयांनाच त्रास होत आहे. काही जिल्हय़ाचा पारा 40 अंशावर पोहोचला आहे.
त्यामुळे काम करणे अशक्मय झाले आहे. यातच वकिलांना अंगात कोट घालावा लागतो. त्यामुळे आणखीनच त्यांना त्रास होतो. ज्ये÷ वकिलांना आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत आहेत. अधिक उष्म्यामुळे घालमेल होत असल्याने सर्वोच्च व उच्च न्यायालयाने कोट सक्तीचा नसल्याचे स्पष्ट केले.
महिला वकिलांनाही दिलासा देण्यात आला असून साडी किंवा पंजाबी डेस, चुडीदार, सलवार-कुर्ता वापरून न्यायालयात काम करता येणार आहे. मात्र, अधिक फॅशनेबल किंवा नक्षीदार कपडे मात्र घालता येणार नाहीत, असेही यामध्ये नमूद केले आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे वकिलांना काहीसा दिलासा मिळाला आहे.









