वृत्तसंस्था / मॉस्को
पाकिस्तानकडून युव्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जात आहे, अशी शक्यता रशियाने व्यक्त केली आहे. या वृत्ताची रशिया पडताळणी करत असून पाकिस्तान युव्रेनला शस्त्रपुरवठा करीत असेल तर ती त्या देशाची गंभीर चूक ठरणार आहे. त्या देशाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. तेव्हा पाकिस्तानने आगीशी खेळू नये, असा स्पष्ट इशारा रशियाने पाकिस्तानला दिला आहे.
रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अॅलिपोव्ह यांनी या संदर्भात पाकिस्तानला तंबी दिली आहे. पाकिस्तान युक्रेन युद्धात नाक खुपसत आहे, असे वृत्त रशियाने गांभीर्याने घेतले आहे. या देशाने रशियाच्या विरोधात कृती करण्याचे दु:साहस दाखवू नये. त्याचे परिणाम गंभीर होतील, असे अॅलिपोव्ह यांनी स्पष्ट केले.









