Weakness And Fatigue : महिला घरातील सदस्यांची नेहमीच काळजी घेत मात्र स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे वयाच्या ३०-४० व्या वर्षी शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. बऱ्याचदा हा थकवा मोठी समस्या होऊन बसते. थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी योग्य आहार तसेच व्यायाम गरजेचा आहे. यासाठी व्यायामासाठी थोडा वेळ काढा. योग्य आहाराबरोबर योगा, एक्सरसाइजवर लक्ष द्या. आज आपण यावर उपाय काय करता येईल तसेच आहारात कोणता बदल करता येईल हे जाणून घेणार आहोत.
आहारात ड्राई फ्रूटचा समावेश करा
महिलांनी आहारात ड्राई फ्रूटचा समावेश करा. यामुळे शरीरात ऊर्जा तयार होते. तसेच व्हिटामीन आणि प्रोटीनची कमतरचा दूर करण्यास मदत करते. शिवाय शरीराला आयरन देखील मिळते. महिलांनी खाण्यात ड्राई फ्रूट मिक्स करा. दुधात टाकून घेऊ शकता किंवा तसेच खाऊ शकता.
गरम पाण्याने पाय शेका
तुमचे दिवसभराचे काम पूर्ण झाल्यावर संध्याकाळी किंवा झोपण्याआधी गरम पाण्यात पाय बूडवून काही वेळ गरम पाण्याचा पायाला शेक द्या. यामुळे शरीर रिलॅक्स होते. आणि थकव्याने शरीरार पेन होत असेल तर यापासून सुटका मिळेल.
फळांचा समावेश करा
महिलांना ड्राय फ्रूट सोबत जास्तीत जास्त फळांचा वापर करा. फळांमध्ये केळींचा वापर करा. दिवसातून किमान चार केळींचा समावेश करा. केळामध्ये कार्बोहाइड्रेटचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे.
खजूर खा
खजूरात पोषक तत्व असतात. याचा फायदा तुम्हाला शरीरात ताकद वाढवण्यासाठी होतो. शिवाय थकवा कमी करण्यास मदत होते. खजूरमध्ये कॅलरी, कार्ब, फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॉपर भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय लोह आणि जीवनसत्त्वेही यामध्ये आढळतात.
योगा करा
योगा आपल्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट केला पाहिजे. योगामुळे शरीराला आराम मिळतो तसेच तणाव दूर होतो आणि मनही शांत राहते. विशेषत: तणाव दूर करण्यासाठी सुखासन करा. दररोज किमान १५ ते २० मिनिटे हा योग केल्याने तुमचे मन शांत राहते. ज्यामुळे तणाव दूर होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर नाश्त्यापूर्वी योगासने करणे आवश्यक आहे.
Disclaimer: : ही माहिती आयुर्वेदिक प्रिस्क्रिप्शनच्या आधारे लिहिली गेली आहे. तरुण भारतचा याच्याशी काहीही संबंध नाही. कृपया ते वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









