ममता बॅनर्जींचे जवानाच्या पत्नीला आश्वासन
पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात असलेला बीएसएफचा जवान पूर्णम कुमार साहूच्या सुखरुप वापसीसाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीएसएफ जवानाच्या पत्नीशी फोनवरून संवाद साधत जवानाच्या मुक्ततेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी रविवारी संध्याकाळी फोन केला होता. पतीच्या मुक्ततेच्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावी, अशी विनंती केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती बीएसएफ जवानाची पत्नी रजनी यांनी दिली आहे. पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये तैनात 40 वर्षीय जवान पूर्णम कुमार साहू हे 23 एप्रिल रोजी चुकून आंतरराष्ट्रीय सीमेच्या पलिकडे पोहोचले होते. यामुळे पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले होते.









