सांगरूळ, वार्ताहर
Kolhapur : शिपेकरवाडीतील कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी आ .पी. एन पाटील अधिवेशन संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेणार आहेत. तसेच घरे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली. राहुल पाटील यांनी शिपेकरवाडी येथे भेट देऊन पाहणी केली त्यांच्या समवेत गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील व बाळासाहेब खाडे उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर कोल्हापूर जिल्ह्यामधील काही गावांना प्रशासनाकडून भूस्खलनाचा धोका असल्याची यादी जाहीर करण्यात आली.करवीर तालुक्यातील बोलोली पैकी शिपेकरवाडी डोंगरात वसलेली असून येथे दरड कोसळण्याच्या यापूर्वी घटना घडल्या आहेत . जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल पाटील यांनी भेट दिली. या गावाच्या डोंगरावर काही मोठं मोठे दगड असून पावसाचा जोर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने आज या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी आम्ही पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहतो . त्यामुळे आमचे पुर्नवसन करावेअशी मागणी केली .
ग्रामस्थासमोर बोलताना राहुल पाटील म्हणाले, शिपेकरवाडी पूर्णपणे डोंगरात वसली असून डोंगर माथ्यावर असणाऱ्या भल्या मोठ्या दगडांच्या मुळे व जोरदार पावसात दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका असून ग्रामस्थांनी एकत्र येऊन पुर्नवसनाची तयारी ठेवा .आमदार पी. एन. पाटील यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याशी फोन वरून चर्चा केली आहे आणि अधिवेशन संपल्यानंतर आ .पाटील व जिल्हाधिकारी याच्याशी बैठक होणार असल्याचे सांगितले . शिपेकरवाडीतील कुटुंबांचे पुनर्वसन करून ‘त्यांना घरे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही राहूल पाटील यांनी दिली.यावेळी उपसरपंच संतराम राणे ,दिगंबर बाटे, सागर राणे ,दीपक बाटे, पांडुरंग शिपेकर गजानन शिपेकर ग्रामस्थ उपस्थित होते.