कोल्हापूर : फुटलेले 40 आमदार पैशाचा पाऊस पाडत आहेत. महाराष्ट्रात जे झालं ते दुर्दैवी होतं. पण ज्या ज्या वेळी शिवसेना फुटली. त्यावेळीही सगळे आमदार फुटले. पण ते निवडून आले नाहीत. नारायण राणे तर पोट निवडणुकीतही पडले. कोल्हापुरात देखील गद्दार लोकं निघाली आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा विरोधी पक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ते आसुर्ले येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
“राष्ट्रवादी आणि पावसाचे नाते काय आहे हे मागील विधानसभेत पाहीले” असे म्हणत अजित पवार यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. “जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील यांनी खदखद केली. त्याच मनमोकळं झाले, हे बरे झाले. शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, असा सातत्याने विचार महाविकास आघाडीने केला. संकट काळात कोणाचे पगार थांबवले नाहीत. महाविकास आघाडी मधील पक्षाचे विचार वेगळे असले तरी मतभेद असणारे मुद्दे बाजूला ठेवले. अन विकासासाठी जे निर्णय घेता येईल ते घेतले. उद्धव ठाकरेंनी दसऱ्याच्या सभेत सांगितलं की आम्ही एकमेकांचा मान ठेवून काम केले. पण आपल्या मतांची विभागणी होणार नाही याची काळजी आता घेतली पाहिजे.” असे पवार म्हणाले.
“आत्ताच सरकार काय करतेय? केवळ शिंदे गट आणि भाजप आमदारांना निधी देणार काय? असा सवाल अजित पवारांनी केला. हे मूठभर लोकांचं राज्य नाही, अशा गोष्टी कोण करत असेल तर कोणी ताम्रपट घेऊन आला नाही. एकनाथ शिंदे कायमचे खुर्चीवर बसणार नाहीत, 145 चा आकडा गेला कि तेही सत्तेतून जातील.” असा टोलाही पवार यांनी लागवला.
“सत्ता येते सत्ता जाते, अजित पवार सत्तेला हापपलेला नाही. तुमच्या भाषणात लोक निघून गेले. लोकांना माहिती नाही आपण कशाला आलो. एसटीला तुम्ही 10 कोटी भरता, कुठून आले हे पैसे. लोकांना एसटी मिळाली नाही, अनेक मार्गांवरील एसटी रद्द झाल्या, यांचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे” असे पवार म्हणाले.
“शिंदे साहेब हा महाराष्ट्र आहे, हे चालणार नाही. कालच्या भाषणात महागाई, बेरोजगारीवर बोलणे यांचे काम होते. कुठे गेले हे बोल, सरकार कुठे गेले.एकनाथ शिंदेना पहिल्यांदाच एवढं लोक दिसले, म्हणून काहीही बोलत सुटले. पहिल्यांदा मुख्यमंत्री यांच्या भाषणात लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही, पण ठाकरे यांचा भाषणाला लोकांचा प्रतिसाद मिळाला. राज्यात जे काय झालं ते परवडणारं नाही कर्नाटक सरकार पाडलं, महाराष्ट्र सरकार पाडलं, राजस्थानचं सरकार पाडलं,पण जे हातात आहे ते चालवता येईना. आपल्या सोबत आलेले परत जातील या भीतीने मंत्रिमंडळ विस्तार करत नाही. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मित्र उत्तर देतात. यापूर्वी महाराष्ट्रात असे काही झाले नाही.” असेही पवार यावेळी म्हणाले.
… हा कोरेंचा माणूस हाय का?
भाषणात माईक बंद पडल्याने अजित पवारांनी मिश्किल पणे प्रतिक्रिया दिली. आरे बाबा तुझे बिल दिले जाईल, त्याला आमदार कोरेंनी पाठवला का बघा, असे म्हणताच हशा पिकला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








