पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आश्वासन
बेळगाव : कार्यसिद्धी अंजनेयस्वामी देवस्थानच्या बाजूस यात्रा उत्सवासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खाते तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. त्यांनी सोमवारी रामतीर्थनगरातील जीर्णोद्धार केलेल्या कार्यसिद्धी अंजनेयस्वामी मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी देवस्थान समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर दुर्गा महिला मंडळ व देवस्थान समितीतर्फे संयुक्तपणे निवेदन देण्यात आले. प्रारंभी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुरेश उरबीनट्टी यांनी स्वागत केले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी मंदिराची पाहणी केली. यावेळी एस. जी. कल्याणी, मनोहर काजगार, एस. एल. सनदी, जी. एस. पाटील, दुर्गा महिला मंडळाच्या निर्मला उरबीनट्टी, प्रेमा बागेवाडी, सुनीता केरुर, काव्या चिटगी आदी उपस्थित होते.









