दाभाळ, मोले, साकोर्डा पंचायत क्षेत्रात पाणी प्रकल्पाचे उद्घाटन : बांधकाम खात्याच्या तक्रारी थेट पीडब्ल्युबी अॅपवरून नोंदवा
धारबांदोडा ; गोवा सरकारने केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत संपुर्ण गोव्यात शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वानी मिळून काम केल्यास टॅकरमुक्त गोवा साध्य करणे सहज शक्य आहे. जर सरकार चांगले रस्ते, शुद्ध पाणीपुरवठा व अखंडीत वीजपुरवठा करू शकत नसेल तर आपल्या सरकारने आपण सक्षम आहोत क? यावर विचार करावा लागेल अशी भावना बांधकाम मंत्री निलेश काब्रांल यांनी व्यक्त केली. आपण स्पष्टच बोलत असल्याचे त्यांनी नमूद केले. सावर्डे मतदार संघातील किर्लपाल दाभाळ पंचायत क्षेत्रातील कोडली येथे चार कोटी खर्चुन, मोले पंचायत क्षेत्रातील धाट सांगोड येथे अडीच कोटी खर्चुन व साकोर्डा पंचायत क्षेत्रातील मधलावाडा येथे साडेचार कोटी रूपये खर्चुन बांधण्यात आलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
बांधकाम खात्याच्या तक्रारी ऑनलाईन पीडब्ल्युडी अॅपवर नोंदवा
सावर्डे मतदारसंघ टॅकरमुक्त झाला पाहिजे असा आदेश आपण संबंधित अधिकाऱ्याना दिला आहे. शिवाय काणकोण, केपे, सांगे, कुडचडे व सावर्डे या पाच मतदारसंघात शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरवठा व्हावा याची जबाबदारी एका अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे असे सांगून गेल्यावर्षी आपण रस्त्यावर ख•s दिसणार नाही याची घोषणा केली होती खरी पण यावर्षी ती नक्कीच पुर्ण केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. गुगल प्लेस्टोर वरून पीडब्ल्युडी अॅप डाऊनलोड करून लोकांनी आपल्या तक्रारी त्यावर नोंद कराव्यात या अॅपचा कसा वापर करावा यासाठी गरज भासल्यास बांधकाम अधिकाऱ्याकडून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला सांगितले जाईल असे ते शेवटी म्हणाले. यावेळी त्याच्यासोबत व्यासपीठावर सावर्डे मतदास संघाचे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सुवर्णा तेंडूलकर, धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्या सुधा गावकर, साकोर्डा सरपंच प्रिया खांडेपारकर, उपसरपंच शिरिष देसाई, मोले सरपंच कपिल नाईक, कुळे सरपंच गोविंद शिगांवकर, बांधकाम खात्याचे मुंख्य अभियंते श्री म्हापणे, अधिक्षक अभियंता नितीन नेवरेकर, कार्यकारी अभियंता थॉमस मेंडीस, सहाय्यक अभियंता देविदास बोरकर, तांत्रिक सहाय्यक अंतरिक्ष नाईक, कनिष्ठ अभियंते गोपाळ नाईक व शैलेंद्र बाबशेठ उपस्थित होते.
दाभाळ, मोले व साकोर्डा भागात रू. 11 कोटी खर्चुन पाणीप्रकल्प
आपण सावर्डे मतदारसंघ टॅकरमुक्त करण्याचा नारा दिला जातो तो आता पुर्ण होणार आहे. सुमारे 11 कोटी रूपये खर्चुन तिन्ही पाणी प्रकल्प पुर्ण करण्यात आले आहेत. यात मंत्री निलेश काब्राल यांचे महत्च्वाचे योगदान आहे. पैशांची अपेक्षा न करता जमीन मालकांनी आपली जमीन दिल्याने हे प्रकल्प पुर्ण होण्यासा मदत झाली आहे असे सांगून ज्या लोकांनी या प्रकल्पांसाठी जमीन दिली आहे. त्यांना सरकारतर्फे योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी आमदार गणेश गावकर यांनी मंत्र्याकडे यावेळी केली. गेल्या साठ वर्षात या भागात विकास हव्या त्या गतीने झालेला नव्हता मात्र आता झपाट्याने विकास होत आहे. लोकांच्या सार्वजनिक मागण्या सरकार नक्कीच पुर्ण करणार आहे असे ते पुढे बोलताना म्हणाले. सरपंच प्रिया खांडेकर यांनी आपले मनोगन व्यक्त केले. तिन्ही प्रकल्प पुर्ण करण्यासाठी ज्यानी महत्वाचे योगदान दिले अशा अभियंत्यांचा याठिकाणी मंत्री काब्रांल व आमदार गणेश गावकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.









