पाकिस्तानी विदेशमंत्र्यांचे बदलले सूर
भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू झाल्यावर आता पाकिस्तानने भारतासोबत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि विदेशमंत्री इशाक डार यांनी पुन्हा एकदा भारतासोबत चर्चेची घोषणा केली आहे.
दोन्ही देशांदरम्यान समस्यांवर उपाय शोधण्यासाठी राजनयिक चर्चा करावी लागेल. आम्ही चर्चा करू असे जगाला कळविले असल्याचे डार यांनी म्हटले आहे. शस्त्रसंधी 18 मेपर्यंत असल्याचा दावा डार यांनी पाकिस्तानच्या सिनेटमध्ये बोलताना केला आहे. तर डार यांच्या दाव्याबद्दल भारताने अद्याप कुठलीच टिप्पणी केलेली नाही.
पाकिस्तानच्या या दाव्यामुळे दोन्ही देशांदरम्यान सैन्यसंघर्ष सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शस्त्रसंधीवर सहमती झाल्यापासून पाकिस्तान एका मागोमाग एक खोटे दावे करत आहे. यापूर्वी भारताच्या विरोधात पाकिस्तानी सैन्याचे कौतुक करताना इशाक डार यांनी खोट्या वृत्ताची मदत घेतली होती, याची पोलखोल त्यांच्याच देशाच्या प्रसारमाध्यमाने केली आहे.









