कोल्हापूर : सात वर्षात आम्ही मंत्री, गृहमंत्री आणि तपास अधिकाऱ्यांना भेटलो. पण आता एटीएस चांगला तपास करेल, अशी आशा व्यक्त करतो. अशी प्रतिक्रिया मेघा पानसरे यांनी दिली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपशील उच्च न्यायालयाने एटीएसकडे देण्याचे आदेश दिलेत. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
गेले अनेक वर्ष आम्ही हा तपास एटीएसकडे द्यावा अशी मागणी करत होतो. तपासबाबत कोर्टाने समाधान व्यक्त केले होते, अनेकांवर ताशेरे ओढले होते. 22 एप्रिल 2022 रोजी तपास बदलण्याचा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला होता. सात वर्षे मारेकरी सापडत नाहीत, तपास अधिकारी येतात जातात, म्हणून आम्ही ही मागणी केल्याचे पानसरे यांनी सांगितले.
केवळ खुनापुरता विचार न करता याच्या सूत्रधारापर्यंत जाणे महत्वाचे आहे. यांच्यात कोण आणि कोणत्या संघटना आहेत? याचा शोध लागणे आवश्यक आहे. हा खटला सुरु राहणार असून त्यासोबत तपास सुरु राहण्यासाठी हा तपास एटीएसकडे देण्याचा विचार झाला. असे मेघा पानसरे म्हणाल्या.
सात वर्ष झाले पानसरेंच्या हत्येचे मारेकरी सापडत नाहीत. आजही आम्हाला न्यायालयाने विनंती करावी लागते. अशी खंत मेघा पानसरे यांनी व्यक्त करत अनेक मंत्री, गृहमंत्री आणि तपास अधिकाऱ्यांना भेटलो आहे. पण निराश होऊन चालणार नाही. एटीएस हा तपास करेल, अशी आशा आम्ही व्यक्त करतो, अशा मेघा पानसरे म्हणाल्या.
Previous Articleआमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, उदय सामंत समर्थकांचा इशारा
Next Article धर्माधर्मातील वाद मिटवून सर्वांनी एकत्र यावे








