केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती
पणजी : उत्तर गोवा खासदार आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे विकासकामे करण्यात देशभरात 10 व्या मानांकनावर असल्याची माहिती त्यांनी स्वत:हून दिली आहे. आपल्यावर टीका करणाऱ्यांनी याची दखल घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. आपण केलेल्या विकासकामांची पावती याच मानांकनातून मिळाली आहे. प्रसारमाध्यमांनी हे मानांकन दिल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले आहे. टीका करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे परंतु ती करण्यापूर्वी वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. काहीजण गैरसमजुतीने टीका करतात. अशांनी खात्री कऊन घेणे गरजेचे आहे. किती विकासकामे केली याची माहिती घेऊन मगच बोलावे, असेही नाईक यांनी सूचित केले आहे.









