लक्ष्मीदास चिमुलकर यांचे स्पष्टीकरण : हणजूण सात पंचाची एकत्रित पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी /म्हापसा
हणजूण – कायसूव पंचायतीमध्ये निवडून आलेले पंचसदस्य विविध पक्षाशी एकनिष्ठ आहेत मात्र हा गट अपक्ष असून यात कोणताही राजकीय पक्ष प्रणित नाही असा खुलासा सातही पंच सदस्यांनी एकत्रित येऊन म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना केला. सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर यांनी वरील माहिती दिली.
यावेळी पंच सुदेश पार्सेकर, सुरेंद्र गोवेकर, दिनेश पाटील, शीतल नाईक, एग्नेस कार्व्हालो व स्मिता खोर्जुवेकर उपस्थित होते. सरपंच म्हणाले, आपल्यास जायंट किलर म्हटले जाते शेवटी ती निवडणूक आहे कोण जिंकणार, हरणार हे होणारच आहे. आपल्यास तसे नावलौकिक नको. सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही गावचा चौफेर विकास कसा होईल याकडे आम्ही अधिक लक्ष देणार आहोत. अशी माहिती नवनिर्वाचित सरपंच सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर यांनी दिली.
फोटो व्हायरलमुळे कडवट प्रतिक्रिया
पंच दिनेश पाटील म्हणाले, आम्ही समविचारी पंचसदस्य हमजूणच्या विकासासाठी एकत्रित आलो आहोत. आम्ही विविध पक्षातील आहोत हे खरे आहे मात्र आम्ही कोणत्या पक्षात नाही आम्हाला आजी माजी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आदीकडे विकासकामासाठी पुढे जायला पाहिजे. आम्ही आज निवडणूक प्रक्रिया संपल्यावर चहा पिण्यालाठी बसलो तेथे आमदार डिलायला लोबो आल्या आणि फोटो काढण्यात आला. आमदार म्हटले की आम्ही नाही म्हणू शकत नाही. नंतर तो फोटो सर्वत्र व्हायरल झाला व आम्हाला कडवट प्रतिक्रिया येऊ लागल्याने आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यायला भाग पडले. असे दिनेश पाटील म्हणाले. आम्हाला कुणाचा लेबल नको आम्हाला विकास करायचा आहे असे ते म्हणाले.
प्रश्न घेऊन आमदारांकडेही जाऊ
आता कुणाला भिण्याची गरज नाही. आम्ही चारजण जुने असून तिघे नवीन आहे. हणजूण वासियांना आता कुणाच्या दडपणाखाली राहण्याची गरज नाही. ग्रामस्थांनी आपले प्रश्न घेऊन आमच्यापुढे यावे ते प्रामुख्याने सोडविण्याकडे लक्ष देऊ असे सुरेंद्र गोवेकर व दिनेश पाटील म्हणाले. आम्ही कुठल्याही आमदाराच्या विरोधात नाही. गरज भासली की आम्ही आमदाराकडेही जाणार आहोत अशी माहिती यावेळी देण्यात आली.









