पालकमंत्री सतीश जारकीहोळी : मुडलगी येथे रे•ाr समाजाचा मेळावा
बेळगाव : योगी वेमन यांनी आपल्या वचन साहित्याच्या माध्यमातून दिलेला संदेश माणसाच्या परिपूर्ण जगण्याला स्फूर्ती देणारा आहे, असे प्रतिपादन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. मुडलगी येथील बसव मंटप येथे तालुक्यातील रे•ाr समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वेमन यांच्या 612 व्या जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. वेमन यांनी त्याग, समाजातील असमानता दूर करण्याबरोबरच चांगल्या समाजासाठी दिलेली शिकवण आजही दिशादर्शक आहे. 600 वर्षांपूर्वी त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांचे तत्त्वज्ञान आचरणात आणणे आवश्यक आहे, असे जारकीहोळी यांनी सांगितले. महापुरुषांचे संदेश जात-धर्म या चौकटीच्या पलीकडे असतात. विशाल मनोभाव ठेवून त्यांनी समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण मानव जातीचे कल्याण करण्याच्या उद्देशाने समाजकार्य केले आहे. याबरोबरच बुद्ध, बसव, डॉ. आंबेडकर यांनीही समाजातील अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. समाजात समानता आणण्याबरोबरच अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार इराण्णा कडाडी, डॉ. गिरीश सोनवालकर आदींनी विचार व्यक्त केले. धारवाड कर्नाटक विद्यापीठाचे प्रा. डॉ. अरविंद करबसनगौडर यांनी वेमन यांच्यावर व्याख्यान दिले.









