वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरिस
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या अर्जेंटिना खुल्या पुरूषांच्या आंतराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्वीसच्या स्टॅनिसलास वावरिंकाने पेद्रो कॅचिनचा पराभव करत एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
या सामन्यात वावरिंकाने पेद्रो कॅचिनचा 6-7 (4-7), 6-1, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. वावरिंकाचा पुढील फेरीतील सामना तृतीय मानांकित निकोलस जेरीशी होईल. या स्पर्धेत क्रोएशियाच्या सिलिकला पराभव पत्करावा लागला. लॅसेलो डिजेरीने सिलिकचा 4-6, 6-3, 6-0 असा फडशा पाडला. सदर स्पर्धा क्लेकोर्टवर खेळविली जात आहे.









