वृत्तसंस्था / मेलबोन
2025 च्या टेनिस हंगामातील येथे 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी स्पर्धा आयोजकांनी स्वीसच्या वावरिंकासह अन्य 9 टेनिसपटूंना वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्याचे ठरविले आहे.
या स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉमधील सामन्यांना प्रारंभ होण्यापूर्वी पात्र फेरीतील सामने खेळविले जातील. वावरिंकाने 2014 साली ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्याने 2015 साली फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम तर 2016 साली अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या. 39 वर्षीय वावरिंकाला गेल्या काही दिवसांच्या कालावधीत दुखापतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागले आहे.









