अमेरिकेत मेगात्सुनामीचा इशारा : नव्या संशोधनात भीतीदायक निष्कर्ष
वैज्ञानिकांनी एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा इशारा जारी केला आहे. हा इशारा पूर्ण जग आणि खासकरून अमेरिकेला घाबरविणारा आहे. हा इशारा मेगात्सुनामीचा असून तो अमेरिकेच्या मोठ्या हिस्स्याला नष्ट करू शकतो. या त्सुनामीमुळे 1 हजार फुट उंच लाटा निर्माण होणार आहेत. त्सुनामीचा सर्वात मोठा धोका हा कॅस्केडिया सबडक्शन झोनमध्ये होणाऱ्या शक्तिशाली भूकंपामुळे निर्माण होणार आहे. म्हणजे प्रथम भूकंप होईल आणि मग त्सुनामी येणार आहे.
वर्जिनिया टेकच्या संशोधकांच्या एका अध्ययनात भूकंप आणि त्सुनामीची ही भविष्यवाणी करण्यात आली आहे. भूकंपामुळे किनारीक्षेत्राचा काही हिस्सा 6.5 फूटांपर्यंत बुडू शकतो, ज्यामुळे त्सुनामी आणखी विध्वंसक ठरणार आहे. हा धोका अलास्का, हवाई आणि अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील काही हिस्स्यांवर घोंगावत आहे. हा भूकंप अचानक होण्याची शक्यता असल्याने लोकांना यापासून वाचण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
पुढील 50 वर्षांमध्ये धोका
पुढील 50 वर्षांमध्ये 8.0 तीव्रतेचा भूकंप होण्याची 15 टक्क्यांपर्यंत शक्यता आहे. 8 तीव्रतेचा हा भूकंप किनारी क्षेत्रांना 6.5 फुटांपर्यंत पाण्यात बुडवू शकतो. हे सिएटल, पोर्टलँड, ओरेगन यासारख्या शहरांना उद्ध्वस्त करू शकते. जर कॅस्केडिया सबडक्शन झोनमध्ये भूकंप झाल्यास अलास्का, हवाई आणि अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील हिस्स्या धोका निर्माण होऊ शकतो असे अध्ययनात म्हटले गेले आहे.
कॅस्केडिया सबडक्शन झोन भूकंपानंतर किनारी पूरमैदानच्या विस्ताराला पूर्वी कधीच गणले गेले नाही. सर्वाधिक नुकसान दक्षिण वॉशिंग्टन, ओरेगन आणि उत्तर कॅलिफोर्नियात होण्याची शक्यता असल्याचे अध्ययनाच्या प्रमुख लेखिका आणि वर्जिनिया टेकच्या भूविज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापिका टीना ड्यूरा यांनी म्हटले आहे.
मेगा त्सुनामी
मेगा त्सुनामी ही सामान्य त्सुनामीपेक्षा वेगळी असते. सामान्य त्सुनामीत लाटा काही फूट उंच असतात, तर मेगा त्सुनामीत लाटा शेकडो फूट उंच असू शकतात. ही त्सुनामी शक्तिशाली भूकंप, भूस्खलन, ज्वालामुखी विस्फोट किंवा उल्कापिंड कोसळण्यासारख्या घटनांमुळे येते. सामान्य त्सुनामीच्या उलट मेगा त्सुकामी अनेक मैल आत शिरू शकते. यामुळे लोकांना बचावासाठी फारच कमी वेळ मिळतो. अशा घटना दुर्लभ आहेत, परंतु घनदाट लोकवस्ती असलेल्या भागात हे घडल्यास प्रचंड जीवितहानी घडू शकते.









