ठरावानंतरही सेवेत कायम करण्यास टाळाटाळ
बेळगाव : किणये, ता. बेळगाव येथील ग्राम पंचायतीतील वॉटरमॅनने पीडीओविरुद्ध तालुका पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यासंबंधी अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे. जयंत लक्ष्मण पाटील हे 2006 पासून वॉटरमॅन म्हणून काम करतात. त्यांची सेवा कायम करण्यासाठी ग्राम पंचायतीत ठराव करण्यात आला होता. ते निरक्षर आहेत म्हणून सेवेत कायम झाले नव्हते. पालकमंत्री व जिल्हा पंचायत सीईओंच्या उपस्थितीत जिल्ह्यातील 25 जवान व वॉटरमॅनना सेवेत कायम करण्यासंबंधी अनुमोदन देण्यात आले होते. यासंबंधी अनुमोदन दिल्यानंतरही पीडीओंकडून किमान वेतन देण्यासही त्रास दिला जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी निवेदनात केला आहे.









