परळी,वार्ताहर
केळवली धबधब्यात शुक्रवारी (ता.22) रोजी एक युवक बुडाला. पाण्यात बुडालेल्या युवकाचा अजुनही तपास सुरु असून शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून सुरु असलेले शोधकार्य शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होते.मात्र हा युवकाला शोधण्यात अद्यापही यश मिळाले नाही.खोल पाण्याचा प्रवाह,आत्याधुनिक पाण्यात बुडून शोध घेण्याचे साहित्य उपलब्ध नसल्याने वरिष्ठांशी बोलून पुण्यातील एनडिआरएफ टीमला बोलावून उद्या तपास पुन्हा सुरु करण्यात येईल असे तहसीलदार आशा होळकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.त्या घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, याठिकाणी शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीम तळ ठोकून आहेत.
सातारा (विकासनगर) येथील 3 युवक शुक्रवारी 22 जुलै रोजी दुपारी केळवली धबधबा पाहायला गेले होते. यावेळी राहुल माने (वय 18) हा युवक ज्या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडते ते पाहण्यासाठी गेला असता पाण्याच्या प्रवाहतच बेपत्ता झाला.यावेळी त्याच्या मित्रांनी आरडाओरडाही केला. मात्र भीतीपोटी ते युवक तसेच साताऱ्याला आले.सायंकाळी उशिरा कुंटुंबियांना हि घटना समजताच त्यांनी तालुका पोलीस स्टेशनमध्ये घटना कळवली.मात्र ज्या ठिकाणी तो युवक बेपत्ता झाला होता त्याठिकाणी रात्री उशीरा तपास करणे शक्य नसल्याने सातारा पोलीसदल तसेच ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी तपास यंत्रणेला सुरुवात केली.
हेही वाचा- राजकीय हालचाली गतिमान होणार:करवीर तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींचे ओबीसी आरक्षण सोडत २९ जुलैला
पहाटे लवकर माने कुटुंबियांचे नातेवाईक,मित्र परिवार केळवलीमध्ये दाखल झाले होते. यानंतर सातारा तालुका पोलीस दलाचे कर्मचारी दाखल होत शोधकार्य सुरु केले.मात्र त्यांनाही यश आले नाही.सकाळी अकरा वाजता तहसीलदार आशा होळकर,मंडल अधिकारी युवराज गायकवाड यांनीही शोधकार्यात सहभाग घेतला. दुपारी 3 वाजता शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीमचे जवान आपल्या साहित्यासह दाखल झाले.मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तसेच मोठ-मोठे दगड,खोल पाणी यामुळे शोधकार्य करण्यात अडथळा निर्माण होत होता. आज रविवारीही शोधकार्य सुरुच राहणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीमकडून सांगण्यात आले.
…तर एनडिआरएफच्या टीम पाचारण करण्यात येईल
सकाळपासून सुरु असलेले हे शोधकार्य पुर्ण क्षमतेने काम करत असले तरी खोल पाण्याचा प्रवाह,आत्याधुनिक पाण्यात बुडून शोधघेण्याचे साहित्य उपलब्ध नसल्याने वरिष्ठांशी बोलून पुण्यातील एनडिआरएफ टीमला बोलावून उद्या तपास पुन्हा सुरु करण्यात येईल असे तहसीलदार आशा होळकर यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









