पाच दिवसांपासून दुरुस्तीकडे दुर्लक्ष
बेळगाव : पाऊस लांबल्यामुळे पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. शहरामध्ये काही भागामध्ये पाणीपुरवठाच केला जात नाही. असे असताना काही ठिकाणी मात्र मुख्य पाईपलाईनला गळती लागून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसपीएम रोडवरील कपिलेश्वर पुलानजीकच गेल्या पाच दिवसांपासून पाईप फुटून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसपीएम रोडवरील रेणूका हॉटेलसमोरच पाण्याची पाईप फुटून गेल्या पाच दिवसांपासून पाणी वाया जात आहे. मात्र त्याकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळ तसेच एलअॅण्डटी कंपनीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. तातडीने या पाईपची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.









