प्रतिनिधी / सांगली
सांगली शहर पाणी पुरवठा योजना अंतर्गत 56 आणि 70 एमएलडी अशा दोन्ही जलशुध्दीकरण केंद्राचा पाणी पुरवठा सुरू ठेवणाऱ्या रायझिंग मेन पाईपला दुसऱ्या रायझिंग टाकलेल्या मेन पाईपशी जोडण्याच्या कामामुळे तसेच फिल्टर बेडचे नादुरुस्त व्हॉल्व बदलण्यासाठी मंगळवार दि.12 रोजी केंद्राचा पाणी पुरवठा बंद ठेवुन सकाळ 9 वा.पासुन हाती घेणेत येणार आहे. त्यामुळे बुधवारी सांगलीला पाणी पुरवठा होणार नाही असे महापालिकेने जाहीर केले आहे. हे काम बुधवार दि.13 रोजी दुपार पर्यंत ट्रायलसह पुर्ण होणे अपेक्षित आहे.
यामुळे बुधवार सकाळी यशवंतनगर,माळबंगला जुनी,आर टी ओ, जयहिंद कॉलनी,वसंत कॉलनी, आणि वाल्मिकी आवास या टाक्या मधुन पाणी पुरवठा होणार नाही.तसेच काम पुर्णत्वानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार 14 रोजी सकाळी अपुरा व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे. याची नोंद घेवुन नागरीकांनी मिळणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता सी.एस.कुरणे यांनी केले आहे.
Previous Articleठाकरेंनी प्रवेश दिला पण उमेदवारी जाहीर का नाही? काँग्रेसने मतदार संघावर दावा का केला नाही ?
Next Article हुंडाई क्रेटा एन लाईन १६.८२ लाख रुपयांमध्ये लाँच








