प्रतिनिधी / खानापूर : शहराला लागून असलेल्या खेमेवाडी गावात गेल्या महिन्यावरापासून पाणी पुरवठा बंद झाला आहे. गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. याबाबत हेस्कॉमकडे वारंवार तक्रार करून देखील हेस्कामने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ग्राम पंचायतीने याबाबत पत्र देऊन सुद्धा या ठिकाणी टीसी बसवण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने गेल्या महिन्याभरापासून खेमेवाडीत पाणीपुरवठा बंद आहे. लोक शेतातील पाणी वापरत आहेत त्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण दिल्यासारखे आहे. तसेच ग्रामपंचायतीकरडून आठ किंवा दहा दिवसांनी एकदा टँकर येत आहे. पाण्याविना महिलांचे मोठे त्रास होत आहेत. तसेच आता चुकीचा हंगाम सुरू झाल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिला आता आक्रमक झालेल्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









